गडचिरोली : शिवाजी हायस्कूलचा निकाल ९०.९४%, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात पार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली यांनी यंदाही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये 90.94% इतका एकूण निकाल साधला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.या परीक्षेत अनुज हरिपाल मेश्राम याने 89.40% गुण मिळवून शाळेतील प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या पाठोपाठ कु. ऐंजल गायकवाड (89.20%), जित मुक्तेश्वर (88.40%), गौरव वादीकर (86.60%), रोशन चौधरी (85.80%), अभिनव खेवले (85.40%), कु. चांदनी उसेंडी (85.20%), कु. पोर्णिमा निमजे (85.20%), कु. गुंजन ऐंपलवार (84.60%) व नयन तुमसरे (84.20%) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यंदाच्या निकालात 34 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 69 प्रथम श्रेणीत, 101 द्वितीय श्रेणीत तर 48 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव जी. व्ही. बानबले, सदस्य डी. एन. चापले, अरुण पाटील मुनघाटे व शरद पाटील ब्राम्हणवाडे, तसेच प्राचार्य सी. के. राऊत, उपमुख्याध्यापक के. एन. रडके, पर्यवेक्षक सी. एस. मुंगमोडे व डी. आर. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या यशामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscresult2025 #10thresult2025 #शिवाजीहायस्कूल #गडचिरोली #एसएससीनिकाल2025 #गुणवंतविद्यार्थी #विद्यार्थीसत्कार #शैक्षणिकयश #महाराष्ट्रशिक्षण #SSCResults2025 #विद्यार्थीप्रेरणा #ShivajiHighschoolGadchiroli #ShivajiHighschool
#GadchiroliPride #SSCResults2025 #TopStudents
#AcademicExcellence #StudentFelicitation
#SchoolAchievement #InspiringStudents
#TeacherSupport #SuccessStory