गडचिरोली ऐतिहासिक रात्रीसाठी सज्ज : उद्या GDPL प्रीमियर लीग फायनल, पुरस्कार सोहळा आणि सोनू निगम यांचा ग्रँड कॉन्सर्ट

1275

– 20,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांची राहणार उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीगचा रोमांचक अंतिम सामना, त्यानंतर पुरस्कार समारंभ आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या ऐतिहासिक संगीत मैफिलीसह एक अभूतपूर्व क्रीडा आणि मनोरंजन पर्व उद्या १९ मार्च २०२५ रोजी MIDC मैदान, गडचिरोली येथे साकार होणार आहे. या कार्यक्रमाला तब्बल जवळपास २०,००० प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आयोजकांकडून तशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
गडचिरोली प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात गडचिरोली हरिकेन्स आणि गडचिरोली वॉरियर्स (पोलीस संघ) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना दुपारी ४:०० ते ७:०० या वेळेत पार पडणार आहे.
संघांच्या उत्कृष्ठ खेळाडूंच्या योगदानाची दखल घेत संध्याकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत भव्य पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ८:०० वाजता सुरू होणारी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांची संगीत मैफल या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. गडचिरोलीत प्रथमच अशा दर्जेदार कलाकाराचा कार्यक्रम होणार असल्याने, हा क्षण ऐतिहासिक ठरणार आहे.
या विशेष कार्यक्रमाला गडचिरोलीचे सह-पालकमंत्री, आमदार, खासदार आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन म्हणाले, “हा सोहळा गडचिरोलीच्या चैतन्य आणि एकतेचे प्रतीक आहे. क्रीडा, मनोरंजन आणि संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव अनेक वर्षे लक्षात राहील. सोनू निगम यांच्या मैफिलीसह हा ग्रँड फिनाले निश्चितच संस्मरणीय ठरेल, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.”
जे प्रेक्षक वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम YouTube वर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here