The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्ती छुप्या मार्गाने अवैध दारू विक्री व वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
३१ मार्च रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, कुनघाडा रै येथील गोलु मंडल हा लाल रंगाच्या एक्स यु व्ही ५०० वाहनातून अवैध दारू वाहतूक करणार आहे. पोलिसांनी सापळा रचून वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी वाहन जंगलात सोडून फरार झाला. वाहनाची तपासणी केली असता, २.१६ लाख रुपयांची विदेशी दारू, २.१० लाख रुपयांची देशी दारू आणि पाच लाखांचे वाहन असा एकूण ९.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गोलु मंडल व अज्ञात वाहनचालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यापूर्वीही गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews