– पुन्हा एकदा डोके वर काढून जाळपोळ करत सक्रिय असल्याचा दिला इशारा
The गडविश्व
गडचिरोली, २८ फेब्रुवारी : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढून मिक्सर मशिनची जाळपोळ करत अहिंसक कृतीतून सक्रिय असल्याचा इशारा दिला आहे. सदर घटना सोमवार २७ फेब्रुवारी रात्रोच्या सुमारास भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या बोटनपूंडी-विसामुंडी मार्गावर घडवून आणली असून मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून नक्षल सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. भामरागड तालुक्यातील बोटनपुंडी-विसामुंडी मार्गावर गोंदिया येथील व्हालिया अँड ब्रदर्स कन्ट्रंक्शन कंपनीअंतर्गत पाईप कलवटचे काम सुरु आहे. दरम्यान नक्षल्यांनी सोमवारी रात्रोच्या सुमारास संबंधित कामावरील एजेएक्स २५०० क्रमांकाचे मिक्सर मिशनची जाळपोळ केली. सदर घटना मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या जवानांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात नक्षल्यांविरोधात ताडगाव पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर घटनेने मात्र परिसरात नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत असून परिसरात दहशत पसरली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Naxal) (Bhamragadh) (Tadgao Police Madat Kendr) (Sp Nilotpal)