गडचिरोली नगर परिषदेची डिजिटल झेप : ‘ क्यूआर कोड’ स्कॅन करून पथदिव्यांच्या तक्रारी करा ऑनलाइन

36

– पथदिव्यांसाठी नवी ऑनलाइन प्रणाली सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : गडचिरोली नगर परिषदेने शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवित, पथदिव्यांच्या तक्रारींसाठी नवी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या मदतीने नागरिकांना पथदिवे बंद असणे, नादुरुस्त होणे किंवा दिवसा सुरू राहणे अशा तक्रारी घरबसल्या नोंदविता येतील.
तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी दिलेला QR कोड स्कॅन करावा किंवा अधिकृत लिंकवर https://docs.google.com/forms/d/1F2HkTvgKSc4Q_RKkSOO6llR6UXur3ga-U6MDYrfCL_w/viewform?edit_requested=true क्लिक करावे लागेल. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष नगर परिषद कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.नगर परिषद प्रशासनाने सांगितले की, या प्रणालीमुळे तक्रारींचे निवारण जलद, प्रभावी आणि पारदर्शकपणे होणार असून शहरातील पथदिवे सुरळीत ठेवण्यात मदत होईल. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सुविधा वाढविणे हा आहे.सदर उपक्रमास नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाचे प्रमुख यांचा सक्रिय पाठिंबा लाभला आहे. नागरिकांनी या प्रणालीचा व्यापक वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #नगरपरिषद #पथदिवे #ऑनलाइनतक्रार #डिजिटलउपक्रम #स्मार्टसिटी #सार्वजनिकसुविधा #नागरिकांसाठीसोय #गडचिरोलीबातमी #Maharashtra#Gadchiroli #MunicipalCouncil #StreetLights #OnlineComplaint #DigitalInitiative #SmartCity #PublicServices #CitizenFacility #GadchiroliNews #Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here