– जिल्हा सिमेवरील नागरिक नेटवर्कच्या शोधात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्हयातील सिमावर्ती भागात आजही अनेक समस्या आवासुन उभ्या आहेत. सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर येथे काही वर्षांपूर्वी बीएसएनएल टॉवर उभारण्यात आले तेव्हा गावासह परिसरात भरपूर नेटवर्क मिळेल अशी अशा होती मात्र ती परिस्थिती न दिसता ‘मोबाईल, सिमकार्ड महाराष्टाचे नेटवर्क मात्र छत्तीगडचे’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या परिसरातील ग्राहकांना महाराष्ट्राचा नेटवर्क न मिळता छत्तीसगड राज्याच्या नेटवर्कचा शोध घ्यावा लागतो आहे ते सुध्दा उंच ठिकाणी जावून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
टॉवर निर्माण झाल्यापासून येथील ग्राहकांना योग्य नेटवर्क मिळत नाही आहे त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कधी उंच ठिकाणी तर कधी झाडावर चढून नेटवर्कचा शोध घ्यावा लागत आहे. झिंगानूर गावातील जवळपास ३ हजारांवर मोबाईल संच आहेत तसेच शासकीय आश्रम शाळा कर्मचारी, जिल्हा परिशद प्राथमिक शाळा कर्मचारी आदींसह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल आहेत. परंतु त्यामानाने येथील टॉवर योग्य सेवा देन नसल्याने नागरिकांना इतरांशी मोबाईलव्दारे संपर्क साधायचा असल्यास उंच टेकडीवर तर कधी झाडावर चढून नेटवर्कचा शॊध घ्यावे लागत आहे. नेटवर्कचा शोध घेत असतांना ते सुध्दा महाराष्ट्राचा नाही तर छत्तीसगड राज्याचा नेटवर्क शोधावा लागत असल्याचे कळते. छत्तीगडमधील भोपालपट्टनम येथील टॉवरच्या रेंजचा वापर करावा लागत आहे. झिंगानूर येथील टॉवर शोभेची वस्तु बनली असुन एकही फोन येत नाही व फोन लावल्यास लागत नाही म्हणून ‘मोबाईल, सिमकार्ड महाराष्ट्राचे तर नेटवर्क छत्तीगडचा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती कोरची तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुद्धा पहावयास मिळत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, sironcha, jhinganue, bsnl network, gadchiroli)