– पोलिसांची मोठी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली,दि. २० : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण ६,३८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मनोज वामन ऊईके (रा. शिवणी, ता. गडचिरोली) हा आपल्या मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहनातून देशी व विदेशी दारू गडचिरोली शहरात आणत होता. यावरून पोलिसांनी गडचिरोली-चामोर्शी रोडवरील सेमाना मंदिराजवळ सापळा रचला आणि संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता, त्यात २५ बॉक्स देशी दारू आणि ४ बॉक्स विदेशी बिअर आढळून आले.
ही कारवाई करताना पोलिसांनी स्विफ्ट चारचाकी वाहनासह एकूण ६,३८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, ही दारू त्याने किरण ताटपल्लीवार आणि लखन ऊर्फ लंकेस यांच्याकडून घेतली आहे. या तिघांविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे कलम 65(अ), 98(2), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी मनोज ऊईकेला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सफौ/ कैलास नरोटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप. पोलीस अधीक्षक एम. रमेश (अभियान), आणि गोकुल राज जी. (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, पोहवा दंडीकवार, पोअं पंचफुलीवार आणि पोअं कोडाप यांनी पार पाडली.
गडचिरोली पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यात अवैध दारूविरोधात चालविल्या जाणाऱ्या मोहिमेला मोठे यश ठरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#गडचिरोलीपोलिस #दारूबंदी #अवैधदारू #पोलीसकारवाई #गडचिरोली #क्राईमन्यूज #महाराष्ट्रपोलिस #दारूविरोधीमोहीम #CrimeReport #PoliceAction #IllegalLiquor #LocalCrimeNews #GadchiroliPolice #IllegalLiquor #LiquorSeizure #CrimeNews #PoliceAction
#MaharashtraPolice #AlcoholBan #LawEnforcement #CrimeUpdate #SwiftCarSeized #LiquorSmuggling #AntiLiquorDrive
#BreakingNews #GadchiroliCrime
