– स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई;
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ तस्करीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार गडचिरोली पोलीस दलाने आणखी एक मोठी कारवाई करत 1 कोटी 19 लाख 83 हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला. घराच्या सांदवाडीत गांजाची अवैध लागवड करून विक्रीसाठी उत्पादन करणारा संशयित कृष्णा हरसिंग बोगा (वय 41, रा. हुर्यालदंड, ता. कुरखेडा) याला ताब्यात घेण्यात आले.
गोपनीय बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 14 नोव्हेंबर 2025 रोजी मौजा हुर्यालदंड येथे दाखल झाले. संशयिताच्या घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले व बिया असलेल्या कॅनबिस वनस्पतींची लागवड केलेली आढळली. या ठिकाणी सापडलेला गांजा एकूण 239.66 किलो वजनाचा असून त्याची बाजारभावानुसार किंमत 1,19,83,000 रुपये इतकी आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपी कृष्णा बोगा हा गांजा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुराडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अधिनियम 1985 च्या कलम 8(सी), 20(बी), 20(बी)(त्त)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेला सर्व अंमली पदार्थ मयत पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्वल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनी समाधान दौंड, पोअं रोहीत गोंगले, पोअं प्रशांत गरफडे, पोअं शिवप्रसाद करमे, चापोअं गणेश वाकडोतपवार, पोहवा संतोष नादरगे, पोअं नितेश सारवे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














