गडचिरोली : रानटी हत्तींचा धुमाकूळ, वन कर्मचाऱ्यास केले ठार

4101

– घटनेने वनविभागात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १६ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ माजवला असून आज १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी रानटी हत्तीने वनकर्मचाऱ्यास ठार केल्याची माहिती पुढे येत आहे. सदर घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. सुधाकर आत्राम (५०)असे मृतक वनकर्मचाऱ्याचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून देसाईगंज तालुक्यातील काही भागात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ माजवला असून अनेक शेतपिकांचे नुकसान केले आहे. अशातच आज १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी देसाईगंज तालुक्यातील डोंगरगांव (हलबी) येथे रानटी हत्तीच्या कळपाने एका वन कर्मचारी (वाहन चालक) ला ठार केल्याची घटना घडली. हत्तीने सदर वाहन चालकाला अगोदर सोंडाने व नंतर पायाने चेंदुन मारल्याची माहिती आहे. सदर घटनेने परिसरात व वनविभागात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here