– ईच्छुक स्थानिक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी तालुक्यातील रिक्त असेलेल्या पोलीस पाटील पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा यांचे अंतर्गत (कुरखेडा व कोरची) एकुण ८५ पदे रिक्त असून त्यापैकी १०० % (पेसा) पोलीस पाटील पदाचे ८१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण करीता एकुण ५४ पदे रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती महिला राखीव २७ रिक्त आहेत तसेच २५% ते ५०% अनुसूचित क्षेत्रातील पोलीस पाटील पदाचे एकुण ०४ पदे रिक्त असून त्यापैकी अनुसूचित जमाती सर्वसाधारण करीता ०२ पदे रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती महिला राखीव करीता ०१ रिक्त आहेत. तसेच विमुक्त जाती- अ करीता ०१ पद राखीव आहे. सोबत जोडलेल्या यादीनुसार जाहिरातीमधील नमूद स्थानिक गावातील अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती महिला राखीव व वि.जा. अ संवर्गातील आवश्यक आर्हता धारक व्यक्तीकडून विहित नमुण्यात ऑफलाईन पध्दतीने १६ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे अर्ज मागविण्यात येत आहे.

तर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज यांचे अंतर्गत (देसाईगंज व आरमोरी) एकूण २३ रिक्त पदे असून त्यामधील ९ पदे अनुसूचित क्षेत्रातील व १४ पदे बिगर अनुसूचित क्षेत्रातील आहेत. १० ऑगस्ट २०२३ रोजी काढलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती याप्रवर्गाकरीता शिवणी खुर्द, देऊळगांव, भान्सी, वनखेडा, ठाणेगांव, चिचोली व अनुसूचित जमाती (महीला) याप्रवर्गाकरीता तुलतुली, लोहारा व चव्हेला ही गावे निश्चीत झालेली आहेत. त्याचप्रमाणे बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती या प्रवर्गाकरीता सावंगी, आकापुर चक, अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सिर्सी, इ.मा.व प्रवर्गाकरीतादेविपुर कॅम्प, रावणवाडी, एकलपुर व अरसोडा, वि.जा.(अ) या प्रवर्गाकरीता नवरगांव, चोप, अराखीव (खुल्या) प्रवर्गाकरीता जुनी वडसा, वघाळा, भ.ज. (ड) या प्रवर्गाकरीता वडधा, भ.ज.(क) या प्रवर्गाकरीता किटाळी व आ. दु. घ. (आर्थीक दुर्बल घटकाकरीता) नैनपुर हे गांव निश्चीत झालेले आहेत. सदर नमुद गावातील उचित अहर्ताधारक व्यक्तीकडून विहीत नमुन्यात अर्ज ऑफलाईन पध्दतीने १६ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज येथे मागविण्यात येत आहे.
पोलीस पाटील या पदाचे सरळसेवा भरती प्रक्रीयेचा सविस्तर जाहीरनामा १४ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व संबंधीत गावात, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन येथे प्रसिध्द करण्यात येत आहे.
ईच्छुक स्थानिक उमेदवारांनी दिलेल्या पात्रतेचे निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कुरखेडा, देसाईगंज यांनी कळविले आहे.