गडचिरोली : जनसूनावणीला प्रवेश नाकारला, शेकाप – माकप आक्रमक

56

गडचिरोली : जनसूनावणीला प्रवेश नाकारला, शेकाप – माकप आक्रमक
– जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर धरणे
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : मुधोली – जैरामपूर – गणपूर परिसरात वरद फेरो अलाॅय कंपनीच्या लोह प्रक्रिया प्रकल्पासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विषयक जनसूनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसूनावणीत शेतकऱ्यांच्या वतीने सहभागी होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी जनसूनावणीत सहभागी होण्यापासून कार्यालयाच्या गेटवरच रोखले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर धरणे दिले.

याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते सांगितले की, सदर प्रकल्प ज्या ठिकाणी प्रास्ताविक करण्यात आले, त्या ठिकाणच्या शेतजमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. प्रशासनाने कंपनी करीता जमीन संपादित केलेली नसतांना विनाजमीन तथाकथित प्रकल्पाची पर्यावरणीय जनसूनावणी घेवून अनुसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बळजबरीने कंपनीच्या घशात घालण्याचा षडयंत्र या जनसूनावणीच्या माध्यमातून प्रशासनाने केला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून या अन्यायाविरोधात योग्य यंत्रणांकडे दाद मागणार असून वेळप्रसंगी व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही भाई रामदास जराते, काॅ. अमोल मारकवार, काॅ. देवराव चवळे यांनी दिला आहे.घटनेनंतर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli
#PublicHearing #Shekap #CPI(M)
#FarmersProtest #EnvironmentalHearing #DistrictCollectorOffice #VaradFerroAlloy
#LandAcquisition #Democracy #Protest #MaharashtraNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here