– पोलीस विभागात खळबळ
The गडविश्व
धानोरा, दि. २४ : येथील केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानाच्या कानशिलात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज २४ फेब्रुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गिरिराज रामनरेश किशोर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियन असून यामध्ये गिरिराज रामनरेश किशोर हे कार्यरत होते. ते मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथील रहिवासी असून ऑक्टोबर २०२४ पासून धानोरा येथे कर्तव्यावर होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी ते रजेवरून कर्तव्यावर परतले होते. आज सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास त्यांच्या स्वतःकडील रायफलमधून डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना हि अनावधाने गोळी चालल्याने झाली कि त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
