गडचिरोली : मत चोरीविरोधात जिल्हाभरात काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान, उद्या कॅण्डल मार्च

190

The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : मतदार याद्यांतील घोटाळे आणि मत चोरीच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाभरात स्वाक्षरी अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. तसेच उद्या १४ ऑगस्ट रोजी सायं. ७ वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून मत चोरी केल्याचा आरोप केला होता. हा प्रकार केवळ राजकीय विषय नसून, सामान्य मतदारांच्या विश्वासाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, “लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या स्वाक्षरी अभियानात आणि कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा.” या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #काँग्रेस #मतचोरी #स्वाक्षरीअभियान #कॅण्डलमार्च #राहुलगांधी #लोकशाही #निवडणूक #BJP #PoliticalNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here