गडचिरोली : वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागेची मागणी आणि शासकीय भरतीसाठी काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

89

– जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; लवकरच जागा उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गडचिरोली येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अद्याप स्वतंत्र इमारत तयार झालेली नाही. गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीतसुद्धा आवश्यक जागा उपलब्ध होत नसेल, तर ही बाब शासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे.
सदर महाविद्यालयातील नोकर भरती प्रक्रिया खाजगी एजन्सीमार्फत सुरू असली, तरी अद्याप ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत व्हावी, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इंदिरा गांधी चौकात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, त्यांनी लवकरच वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश युवक काँग्रेस सचिव अतुल मल्लेलवार, तसेच विविध तालुकाध्यक्ष, सेलप्रमुख, माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here