– प्रशासनाला तात्काळ उपाययोजनांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील रेव्हेन्यू कॉलनी, गणेश नगर तसेच आरमोरी रोडवरील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.
या परिस्थितीची दखल घेत गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिले. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जलद गतीने काम हाती घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
या पाहणीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिल्लमवर, सतीश चिचघरे, महेश तिडके, विशाल हरडे, गणेश धाईत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, अंकुश भालेराव तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
“नागरिकांच्या सुरक्षेला व सोयीला प्राधान्य देऊन आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील,” असा विश्वास आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
