– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत होणार गौरव*
The गडविश्व
गडचिरोली,दि. २५ : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांना राज्य शासनाचा २०१९ सालचा ‘केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शासकीय गटासाठी असून, रोख ५१,०००, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.
कांबळे हे कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात छायाचित्रकार म्हणून कार्यरत असताना त्यांनी २०१९ च्या महापुरादरम्यान हेलिकॉप्टरमधून केलेल्या छायाचित्रणाचे तसेच इतर विकासात्मक छायाचित्रांचे राज्यभरात कौतुक झाले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लवकरच मुंबईत होणाऱ्या विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोहित कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार केवळ कांबळे यांच्यासाठीच नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #RohitKamble #PhotographyAward #KKMoosAward #GondwanaUniversity #GadchiroliPride #DevendraFadnavis #KolhapurFloods #Photojournalism #MaharashtraNews #गडचिरोली #रोहितकांबळे #छायाचित्रकार #राज्यस्तरीयपुरस्कार #महाराष्ट्र\_गौरव