The गडविश्व
ता.प्र / भामरागड, दि. ०८ : सांज मल्टी ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, यस्टर एरिया, बिनागुंडा स्थित भामरागड या सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रूपलाल मारोती गोंगले यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथील भरती रुग्णांना सफरचंद, अंगूर आणि केळी यांसारख्या पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात भामरागड येथील प्रतिष्ठित नागरिक तुलशीराम सडमेक तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जस्मीना टेंभुर्णे, डॉ. गायत्री मॅडम, सुचिता नेटे, जी. जी. राऊत, आनंद गावडे, अजय खोब्रागडे, पीयूष बिट्टूरवार, मंजुषा आत्राम आणि सविता वड्डे यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, वनस्पती संयुगे आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, जे रुग्णांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक ताराबाई मारोती गोंगले यांनी रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
