कौशल्यातून रोजगाराकडे : LMGSE च्या पहिल्या तुकडीतील 193 युवक सज्ज

19

कौशल्यातून रोजगाराकडे : LMGSE च्या पहिल्या तुकडीतील 193 युवक सज्ज
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोलीतील युवकांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकासाची नवी दिशा देणाऱ्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमाने ७७ व्या प्रजासत्ताक दिनी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. LMGSE च्या पहिल्या तुकडीतील १९३ विद्यार्थ्यांनी ४५ दिवसांचे सघन कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्रे मिळवली.
हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून साकारला असून, स्थानिक युवकांना उद्योगासाठी सज्ज करणे व त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
प्रमाणपत्र वितरणप्रसंगी बोलताना प्रभाकरन यांनी प्रशिक्षणार्थींना लॉयड्स कुटुंबात स्वागत करत, गडचिरोलीला भारताचे दुसरे जमशेदपूर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. LMGSE मधून मिळालेले प्रशिक्षण युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा उपस्थित होते. गडचिरोली वेगाने औद्योगिक गुंतवणुकीचे केंद्र बनत असून, युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कौशल्य प्रशिक्षण देणारे उपक्रम जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
११ डिसेंबरपासून सुरू झालेल्या LMGSE प्रशिक्षण कार्यक्रमामुळे गडचिरोलीतील युवकांसाठी रोजगाराकडे नेणारा विश्वासाचा मार्ग निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here