माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

89

– महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना केले फळ वाटप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहराच्या अध्यक्षा सौ.कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहराचे महामंत्री विवेक बैस, शहराच्या उपाध्यक्ष स्वाती चंदणखेडे, देवाजी लाटकर, दलित आघाडीचे महामंत्री नामदेव काटवले, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री सिद्धार्थ नंदेश्वर, आदिवासी आघाडीचे विजय शेडमाके, रवी शुद्धलवार, युवा नेते सूरज मस्के, विलास मानकर, आशिष भोपये, भास्कर भांडेकर, त्यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here