The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १६ : धानोरा येथील श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत भव्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी महाविद्यालयाच्या जपलेल्या अनोख्या परंपरेनुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यंदा प्राध्यापक टिकाराम धाकडे हे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात तिरंगा फडकविण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. उदय थुल यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाने जपलेली ही परंपरा शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली.
