“फिक्की स्मार्ट पोलीसिंग पुरस्कार 2024” ने गडचिरोली पोलीस दलाचा ‘प्रोजेक्ट उडान’ सन्मानित

519

– मागील तीन वर्षामध्ये दुस­यांदा गडचिरोली पोलीस दल या पुरस्काराने सन्मानित
The गडविश्व
गडचिरोली, दि. ० ४ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान या उपक्रमाची दखल घेवून नुकताच भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation fo Indian Chambers of Commerce and Industry) च्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार 2024 हा पुरस्कार गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडानला” घोषीत करण्यात आला आहे. फिक्की तर्फे फिक्की फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना आज ४ मार्च २०२५ रोजी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई आणि डीजीपी आरपीएफ अरुण कुमार यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये “Community Policing” या श्रेणीतून गडचिरोली पोलीस दलाची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम माओवादग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 03 मार्च 2023 रोजी “प्रोजेक्ट उडान” हा उपक्रम सुरु करण्यात आला. जिल्ह्रातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासाकरीता आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी या सर्व आयामांचा विचार करुन प्रोजेक्ट उडानची आखणी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट उडान अंतर्गत शिक्षणाकरीता एक गाव एक वाचनालय, समर-विंटर कॅम्प, स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम, ऑपरेशन रोशनी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र अशा बहुआयामी कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. एक गाव एक वाचनालय उपक्रमांतर्गत अतिदुर्गत भागातील गावांमध्ये आतापर्यंत सर्व सोयींनी सुसज्ज अशा एकुण 68 वाचनालयांची निर्मिती करण्यात आली असून दुर्गम भागातील युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत एकुण 112 आश्रम शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकडे कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध पर्यटन स्थळे, संग्रहणालय, विविध संस्कृती यांचे ज्ञान उपलब्ध व्हावे याकरीता आतापर्यंत एकुण 05 समर-विंटर कॅम्पमध्ये 408 विद्यार्थ्यांनी सहभागी करुन घेण्यात आले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास उपयुक्त असे प्रशिक्षण देण्याकरीता व त्यांची सामाजिक जाणीव प्रगल्भ होण्याकरीता इयत्ता 8 वी व 9 वी मधील 300 विद्यार्थ्यांकरीता 05 दिवसीय निवासी स्टुडंट पोलीस कॅडेट शिबिराचा अभिनव प्रयोग महाराष्ट्रात प्रथमत:च गडचिरोली पोलीस दलाकडून करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील होतकरु युवक-युवतींच्या हाताला काम मिळावे व त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा, याकरीता विविध संस्थांच्या सहकार्याने गडचिरोली पोलीस दलाकडून युवक-युवतींकरिता विविध रोजगार प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये फास्टफुड, ब्युटीपार्लर, शिवणकाम, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, टु-व्हिलर मेकॅनिक, फोर व्हिलर मेकॅनिक, टिव्ही ऑपरेटर इ. प्रशिक्षणांचा समावेश आहे. या विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून आतापर्यंत एकुण 12,864 युवक-युवतींना रोजगार-स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या नाविण्यपूर्ण अशा स्किलींग इन्स्टिटयूटच्या माध्यमातून सुशिक्षित युवक-युवतींकरिता सॉफ्टवेअर डेव्हलपर, मिडीया डेव्हलपर, वेब डिझायनर,
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. स्किलींग इन्स्टिटयूटद्वारे एकुण 440 युवक-युवतींना संगणकाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या 205 युवकांची निवड राज्यातील विविध पोलीस दलांमध्ये झालेली आहे.
जिल्ह्रातील अतिदुर्गम भागांमध्ये नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. यादृष्टीने गडचिरोली पोलीस दलाकडून पोस्टे व उपविभाग स्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन केले जाते. याच मेळाव्यांदरम्यान ऑपरेशन रोशनी अंतर्गत 6000 हून अधिक नागरिकांचे नेत्र तपासणी करुन 1200 नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासोबतच 1630 दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप व 820 दिव्यांग नागरिकांना कृत्रीम साहित्य (हात-पाय) वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्रातील शेतक­यांनी आपल्या शेतीमध्ये विविध आधुनिक प्रयोग करावे व त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, यासाठी आतापर्यंत 16 कृषी सहली राज्याच्या विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे येथे पाठविण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्राच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. गडचिरोली जिल्ह्रातील उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील सर्व अधिकारी/अंमलदार यांनी या आव्हानांना स्वीकारुन जिल्ह्रातील गरजु आदिवासी बांधवांपर्यंत जाऊन विविध शासकिय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेऊन उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे. फिक्की (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) च्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोलिसींग हा पुरस्कार गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडानला जाहिर झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील कम्युनिटी पोलीसिंग उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे आणि स्थानिक आदिवासी बांधवांची मने जिंकण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणा­या सर्व अधिकारी/अंमलदार यांचे कौतुक केले आहे. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करतील आणि जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांचे जीवन सुसह्र करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here