खत पुरवठा सुरळीत, गडचिरोली जिल्ह्यात कुठेही टंचाई नाही : कृषी विभाग

22

– सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत युरिया, डीएपी व मिश्र खतांचा मुबलक साठा; आगामी रॅक्समुळे पुरवठा आणखी भक्कम होणार
The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा करण्यासाठी गडचिरोली कृषी विभाग सज्ज असून, जिल्ह्यात सध्या युरिया, डीएपी आणि एनपीके मिश्र खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीकडून ११०० मेट्रिक टन २०:२०:०:१३ ग्रेड खताचे वितरण झाले असून, युरियाचा संरक्षित साठा २७७ टन इतका आहे. किरकोळ विक्रीसाठी १०० टन अतिरिक्त युरियाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषीधन, कृषी देव, कृषी उद्योग यांसारखी पर्यायी स्फुरदयुक्त खतेही बाजारात सहज मिळत आहेत.

जुलै महिन्यातील खत पुरवठा नियोजन

‘रेक प्लॅन’नुसार जुलै महिन्यात २४०० मेट्रिक टन युरिया जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आले असून, यापैकी एक रॅक २ जुलै रोजी वडसा येथे दाखल झाली आहे. पुढील आठवड्यात RCF कंपनीकडून १२०० टन तर कोरोमंडल कंपनीकडून १० ते १२ जुलैदरम्यान २०:२०:०:१३ ग्रेड खताची रॅक येणार आहे.

सिरोंच्यासाठी विशेष उपाययोजना

वाहतुकीच्या अडचणींमुळे सुरुवातीला काहीशी अडथळ्याची परिस्थिती असलेल्या सिरोंच्यात आता युरिया – ८२४ मेट्रिक टन, डीएपी – २५ टन आणि एनपीके कॉम्प्लेक्स – ७४५ टन असा मुबलक साठा उपलब्ध आहे. २ जुलै रोजी आलेल्या रॅकमधून १०० टन युरिया पोहोचविण्यात आला असून, ८ ते १२ जुलैदरम्यान आणखी २५० टन युरियाचा पुरवठा नियोजित आहे.

पर्यायी खतांचा वापर वाढवण्यासाठी मार्गदर्शन

डीएपीसाठी पर्यायी खतांचा वापर वाढवण्यासाठी कृषी अधिकारी आणि तंत्रज्ञ शेतकऱ्यांना एसएसपी, कृषीधन, कृषी देव अशा खतांचे मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे बाजारातील तात्पुरती टंचाई भासू नये.

खत पुरवठा नियमित; तालुकास्तरावर साठा सुनिश्चित

“शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रत्येक तालुक्यात खताचा साठा नियमितपणे पोहोचविला जात असून, किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधून जिल्ह्यात कुठेही टंचाई जाणवू दिली जाणार नाही,” असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी स्पष्ट केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #FertilizerSupply #KharifSeason #Sironcha #Urea #DAP #NPK #AgricultureDepartment #Coromandel #RCF #FarmersSupport #AlternativeFertilizers #KrushiDhan #CropNutrition #NoFertilizerShortage #PreetiHiralkar #GadchiroliFarming #AgricultureNews
#गडचिरोली #खतपुरवठा #खरीपहंगाम #सिरोंचा #युरिया #डीएपी #एनपीके #कृषीविभाग #कोरोमंडल #RCF #शेतकरी #पर्यायीखते #कृषीधन #कृषी_सेवा #गडचिरोली_शेती #PreetiHiralkar #FertilizerSupply #खतटंचाईनाही

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here