The गडविश्व
भामरागड, दि. ३० : भामरागड तालुक्यातील जुवी येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकरी पुसू गिबा पुंगाटी (वय 60) यांची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटना मध्यरात्री घडली असून, घटनास्थळी नक्षलवादाशी संबंधित कोणतेही पत्रक किंवा बॅनर आढळले नाहीत. त्यामुळे या हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
हत्या माओवाद्यांकडून घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . पुसू गिबा पुंगाटी यांचा मृतदेह भामरागड रुग्णालयात हलविण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया धोडराज पोलीस ठाण्यात सुरू आहे.
गडचिरोली पोलिसांकडून या हत्येच्या प्रत्येक शक्यतेची बारकाईने तपासणी केली जात असून, माओवाद्यांचा या घटनेशी संबंध आहे का? की यामागे अन्य कोणते कारण दडले आहे? याचा सखोल तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #Bhamragad #Murder #Farmer #Maoists #Gadchiroli #Naxal #PoliceInvestigation #Crime

#भामरागड #हत्या #शेतकरी #माओवाद #गडचिरोली #नक्षल #पोलीस_तपास #गुन्हा