गणेश अलंकार विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

18

गणेश अलंकार विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
– निमगाव येथे उत्साहात पार पडला निरोप समारंभ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. महिला सुर्या आदिवासी विकास शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या या विद्यालयात रंजनी वासुदेव वरखडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक लालाजी नगराळे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम राजगडे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर गावळे तसेच कु. श्रीरामे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आगामी दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे नियोजन केले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनीही शालेय आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींची साथ आणि शाळेतील संस्मरणीय क्षण यांची आठवण काढताना अनेकांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन एस. व्ही. नागदेवते यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिवाकर भोयर यांनी केले.
भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या समारंभाने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा संस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here