– नोंदणी करण्यासाठी आता १४ आणि ३० ऑगस्ट पर्यंतचा वेळ मिळाला
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. योजनेच्या नोंदणीसाठीची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, कर्जदार शेतकऱ्यांसाठी आता ३० ऑगस्ट आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी नोंदणीची शेवटची तारीख ३१ जुलै होती. मात्र, कागदपत्रे, बँकेशी संबंधित प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता आली नव्हती. ही अडचण ओळखून राज्य शासनाने नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीक विमा योजना शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनिश्चिततेपासून आर्थिक संरक्षण देते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी ही संधी साधून पूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #CropInsurance #PMCropInsuranceScheme #FarmerWelfare #Kharif2025 #DeadlineExtended #FarmerSupport #AgricultureScheme #GadchiroliFarmers #ProtectFarmers #FarmingInsurance #AgriUpdates
#पीकविमा #प्रधानमंत्रीपीकविमायोजना #शेतकरीहित #खरीप२०२५ #मुदतवाढ #शेतीसुरक्षा #गडचिरोलीशेतकरी #कृषिविभाग #शेतकऱ्यांचाआधार #शेतीविमा #शेतीविचार
