– कोकोबंडा येथे भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन
The गडविश्व
एटापल्ली, २५ फेब्रुवारी : खेळातुन मिळवीलेली स्फुर्ती विधायक कार्यांवर खर्च व्हावी असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ता एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम अशा कोकोबंडा येथे आयोजित क्रिडा सम्मेलनाच्या सोहळ्या प्रसंगी उदघाटक स्थानावरून बोलत होते.
यावेळी कबड्डी मैदानाचे रितसर उदघाटन करण्यात आले त्यानंतर औपचारीक भाषणे झाली. याप्रसंगी बोलतांना खेळांच्या दरम्यान तयार होणारा उत्साह, हुरूप तसेच एकीची भावना परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापरावी असे आवाहन केले. स्पर्धा आयोजन केल्याबद्दल तेथील युवकांची माजी पालकमंत्री यांनी प्रशंसा केली. तसेच परिसराच्या विकासासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास सदैव माझे भक्कम पाठबळ असणार अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे कोकोबंडा येथे पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. कोकोबंडा सारख्या अतीदुर्गम भागातील युवकांची कबड्डी सामने घेण्याची इच्छा दर्शविताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी लगेच मदतीचे आश्वासन दिले होते. ते त्या अतिदुर्गम परिसरात भेट देणारे पहीलेच नेते ठरले असल्याचे स्थानिकांनी सांगीतले. कोकोबंडा सह कोटमी व इतर दुर्गम गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील समस्या जाणुन घेतल्या व सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवीली.
याप्रसंगी वनिता हिचामी सरपंच ग्रा.पं. कोहका, प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, मोहन नामेवार, रविभाऊ नेलकुद्री अहेरी, भाजपा तालुका अध्यक्ष, संतोष मद्दीवार भाजपा महामंत्री अहेरी, गुड्डू ठाकरे, विनोद जिल्लेवार, संजय पोहणेकर, लक्ष्मी कुमरे, अन्नपूर्णा मोहुले देवनाथ सोनुले, गोटा, राजू नरोटे, देहू गावडे, मांगूराम उसेंडी, नानाजी कुडयामी, अशोक मडावी, जनली नरोटे, संकु पुंगाठी, लता पुंगाठी, मुकेश कावळे, शत्रू नरोटे, इसरू पोटावी, सुधाकर नरोटे, अनिल गावडे, राकेश नरोटे, रामदास गोटा,व गावातील नागरिक उपस्थित होते.
