धान मळणीनंतर १५ दिवस उलटले, तरी खरेदी केंद्र सुरू नाही

12

– सातबारा ऑनलाइन खोळंब्याने शेतकरी आर्थिक कोंडीत
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : तालुक्यातील सुरसुडी–मालेवाडा परिसरात धानाची मळणी पूर्ण होऊन पंधरा दिवस उलटले असले तरी हमीभाव खरेदी केंद्रांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. त्यातच सातबारा (७/१२) ऑनलाइन अपडेट न झाल्याने पीककर्ज व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक पेचात सापडले आहेत.
“धान गोदामात पडून आहे, विकायचे तर व्यापारी औणे-दोन दर देतात, आणि सरकारची केंद्रे सुरूच होत नाहीत-अशा स्थितीत आम्ही काय करावे?” असा संताप स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने धान खरेदी १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी तालुक्यात केंद्र निश्चित न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाभूमी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे सातबारा डाउनलोड करणे कठीण झाल्याने बँकांचे व्यवहारही रखडले आहेत. व्यापाऱ्यांकडे कमी दराने धान विकल्यास मोठा तोटा होणार, तर कर्जफेड न झाल्यास व्याजवाढीचा तगादा वाढण्याची भीती शेतकऱ्यांना जाणवत आहे. या गंभीर परिस्थितीवर जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि सातबारा ऑनलाइन सेवेतला खोळंबा दूर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here