– एके-४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त, परिसरात शोधमोहीम सुरू
The गडविश्व
नारायणपूर (छ.ग), दि. १८ : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील भीषण जंगलांमध्ये आज सुरक्षाबलांनी नक्षलवाद्यांवर निर्णायक कारवाई करत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. अबूझमाड परिसरात झालेल्या या जोरदार चकमकीनंतर घटनास्थळी एके-४७, एसएलआरसह मोठा शस्त्रसाठा, स्फोटके आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नक्षलविरोधी लढ्याचा टप्पा बदलणारी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.https://x.com/ANI/status/1946195698615247240?s=19
नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबाबत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हा राखीव गट (DRG), विशेष टास्क फोर्स (STF) आणि इतर दलांनी संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केले. जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, मात्र जवानांनी ठोस प्रत्युत्तर देत काही तासांत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.
चकमकीनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत एके-४७ रायफल, एसएलआर, इतर स्वयंचलित शस्त्रास्त्रे, जिवंत काडतुसे, स्फोटके आणि नक्षली दस्तऐवज सापडले. नक्षल चळवळीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबूझमाड परिसरात मिळालेले हे यश सुरक्षादलांसाठी मोठा विजय मानला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #cgnews
#अबूझमाड #नारायणपूर #नक्षलविरोधीमोहीम #चकमक #DRG #STF #NaxalNews #छत्तीसगड
