आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक ९ मार्चला

218

– दोन उमेदवार बिनविरोध, तीन उमेदवारांचे नामांकन अर्ज रद्द तर २० उमेदवार रिंगणात
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : तालुक्यातील रांगी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथिल संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने नव्याने होवू घातलेल्या निवडणूकीत १३ संचालक निवडणून द्यायचे असुन दोन पॅनल निवडणूक रिंगणात उभे असुन निवडणूक ९ मार्च २०२५ ला सकाळी ८.०० ते ४.०० पर्यंत होत असून या निवडणुकीत दोन उमेदवार बिनविरोध, तिघांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले तर २० उमेदवार रिंगणात असुन निवडणूकीत कोण निवडून येणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
सन २०२४-२५ ते २०२९-२०३० या कालावधी साठी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर ऐकून २५ व्यक्ती नी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वसाधारण आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातून महेश कालिदास दुगे, रूपचंद श्रीराम गेडाम, रवींद्र मनोहर हलामी, नितेश सदाराम जांगी, जगदीश महादेव कन्नाके, विनायक काशिनाथ किरंगे, गिरीधर शिवराम कुंमरे,बिसन राजू पदा, लालाजी बावजी पदा, वासुदेव साधोजी टेकाम, विश्वनाथ सखाराम वरखडे.यांचा समावेश आहे. आहे या प्रवर्गातुन (६ )उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
सर्वसाधारण बिगर आदिवासी खातेदार कर्जदार गटामधून राजेंद्र रामचंद्र भोयर, विठ्ठल शिवराम चापडे, केशव डोमाजी मेश्राम, दिलदार खाँ कासमखाँ पठाण यांचे अर्ज आहेत. येथून (२)उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मधून घनश्याम ढिवरू खेवले. या प्रवर्गातुन (१) उमेदवार निवडायचा आहे.
महिला प्रतिनिधी माधुरी लुकेश जांगी, प्रेमिला रामाजी काटेंगे, सुभद्रा रामदास कोवे. यात (२)उमेदवार निवडायचे आहे इतर मागास प्रवर्ग विलास दादाजी भोयर, दिनेश इसन चापले यात (१) उमेदवार निवडायचा आहे.
भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष प्रवर्ग गटातून शशिकांत विठ्ठलराव साळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आहे. या प्रवर्गातुन ( १) उमेदवार निवडायचा आहे अर्ज बाद मधे विजया सदाराम हलामी महिला प्रतिनिधी मतदार यादीतील ४८२ अनुक्रमांक व विजया सदाराम हलामी यांचे नाव नसल्याने अर्ज फेटाळण्यात आला तर चरणदास शुक्ररु खोब्रागडे अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी वर्गातुन नामनिर्देशन अर्ज दाखल करताना सूचकाची स्वाक्षरी नसल्याने आणि लालाजी विठोबा वासनिक भटक्या विमुक्त विशेष प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सदर व्यक्ती त्या वर्गात मोडत नसल्याने उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. यामुळे साळवे गटातिल शशिकांत विठ्ठलराव साळवे आणि घनश्याम ढिवरू खेवले. हे बिनविरोध निवडून आले आहेत तर बाकीच्या उमेदवारांचा फैसला ९ मार्च ला होनार आहे. मतदान वेळ सकाळी ८.०० ते ४.०० वाजता पर्यंत त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here