गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि पुस्तक वाटप

78

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळा व पुस्तक वाटप कार्यक्रम १ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात पार पडला.
या उपक्रमात बी.ए.च्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या ४२२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन करून फसवणुकीपासून बचाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सायबर साक्षरतेची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण सोडलेल्या युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलाने २०१८ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने पाच अभ्यास केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत २५२९ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश, हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “युवक-युवतींनी मोठे स्वप्ने बघावीत व केवळ आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रीत करावे. गडचिरोली पोलीस दल युवक-युवतींच्या शैक्षणीक प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी आहे.” सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, सायबर पोलीस ठाणे येथील मपोउपनि नेहा हांडे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here