The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करता समाज कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण डिजिटल पाऊल उचलले आहे. ‘आपला मित्र’ या नावाने सुरू झालेल्या WhatsApp सेवा उपक्रमामुळे नागरिकांना योजनांची माहिती, कागदपत्रांसंदर्भातील मार्गदर्शन आणि तक्रारी नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे.
9423116168 या क्रमांकावर WhatsApp संदेश पाठवून नागरिक थेट समाज कल्याण विभागाशी संपर्क साधू शकतात. विशेषतः सिरोंचा, भामरागड, इटापल्ली, कोरची यांसारख्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांना आता जिल्हा मुख्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.
या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास टळणार असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकेल.
“‘आपला मित्र’ सेवा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत शासन सेवा पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे,” असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #आपला_मित्र #समाजकल्याण_सेवा #गडचिरोली_विकास #दुर्गमते_डिजिटलतेकडे #सरकार_आपल्या_दारी #WhatsAppसेवा #AaplaMitra #DigitalWelfare #ReachTheLastMile #SocialWelfareOnWhatsApp #InclusiveGovernance #RemoteAccessServices #whatsapp
