३० जूनला गडचिरोलीत धरणे आंदोलन ; सर्वपक्षीय बैठकीत बळजबरी प्रकल्पांविरोधात विद्रोहाची हाक

100

– जमीन बचाओ जनसंघर्ष समिती’ची स्थापना; बेकायदेशीर लोह खाणी, जबरदस्ती भूसंपादन आणि जनसुरक्षा विधेयकावर प्रखर रोष
The गडविश्व
आरमोरी, दि.२६ : गडचिरोली जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात तीव्र जनतेचा रोष व्यक्त करत व्यापक लढ्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डाव्या प्रागतिक पक्षांच्या वतीने आरमोरी येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत ३० जून रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ. डाॅ. महेश कोपूलवार होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणी, प्रक्रीया प्रकल्प आणि जबरदस्ती भूसंपादनासंदर्भात सविस्तर माहिती सादर केली.
बैठकीत सर्व उपस्थितांनी या प्रकल्पांविरोधात एकमुखी नाराजी व्यक्त केली. बेकायदेशीर मंजुरी, जनतेच्या मतांना डावलणे, आणि नव्याने आणलेले ‘जनसुरक्षा विधेयक’ हे लोकशाहीला बाधा आणणारे असल्याची तीव्र टीका यावेळी करण्यात आली. प्रचारासाठी पत्रके, स्थानिक परिषदांचे आयोजन आणि आंदोलनांच्या टप्प्यांवर कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आले.
बैठकीत ‘जमीन बचाओ जनसंघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली. समितीचे निमंत्रक म्हणून रामदास जराते (शेकाप), राज बन्सोड (आझाद समाज पक्ष) यांची निवड झाली. सदस्य म्हणून काॅ. डाॅ. महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, काॅ. अमोल मारकवार, काॅ. डाॅ. धर्मराज सोरदे, ईलियास खान, डोमाजी दिवटे, प्रशांत मडावी, भाई शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे, रूषी सहारे यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून ॲड. जगदिश मेश्राम आणि ॲड. सोनाली मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीला आसपाचे नेते धर्मानंद मेश्राम, भाकपचे काॅ. विनोद झोडगे, राजू केळझरकर, प्रेमचंद चिकराम, सीमा डोंगरे, मो. शरीफ, हाजरा बेगम, मनोज निमगडे,चुन्नीलाल मोटघरे, आपचे महादेव कोपूलवार, पंकज टिचकूले, अमोल मोटघरे, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे, मेघराज भोयर, सुभाष आकलवार, पुरुषोत्तम रामटेके, धनराज दामले, सतिश दुर्गमवार, सुरेंद्र वासनिक, पियुष वाकडे, प्रितेश अंबादे, प्रकाश गेडाम, अक्षय पोरटे, किशोर म्हशाखेत्री, भगिरथ भाकरे, शुभम पोरटे, रमेश मेश्राम, रामदास डोंगरावर, संतोष लांजेवार, अविल पोरटे, संगिता मोटघरे, शुभम पाटील, सुरज ठाकरे, आशिष नेवारे, विजय सुपारे, संजय वाकडे, स्वाती खोब्रागडे यांचेसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३० जूनच्या धरणे आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी होणार असून, हा लढा अन्यायकारक भूसंपादन आणि निसर्गविनाशक विकासाच्या विरोधात निर्णायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #Protest #DharnaAndolan #LandRights #StopLandAcquisition #IllegalMining #IronOreProtest #PeopleVsProjects #AntiDevelopmentProjects #SaveTheLand #PublicMovement #MultiPartyMeeting #GandhiChowkProtest #SocialJustice #FarmersRights #AdivasiRights #ConstitutionalRights #PeopleResistance #SayNoToLandGrab #JanSurakshaBill
#गडचिरोली #धरणेआंदोलन #जमीनबचाओ #लोहखाणीविरोधात #भूसंपादनविरोधात #जनसुरक्षाविधेयक #सर्वपक्षीयबैठक #जनआंदोलन #गांधीचौक #विनाशकारीप्रकल्पविरोधात #जनसंघर्ष #गडचिरोलीबातमी #राजकीयआंदोलन #शेतकरीहक्क #आदिवासीहक्क #संविधानरक्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here