धानोरा : जिल्हा परिषद शाळेत महिला मुक्ती दिन साजरा

111

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०८ : जिल्हा परिषद हायस्कुल धानोरा येथे ८ मार्च  रोजी स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी स्त्रियांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचीं आठवण करण्याकरिता, महिला करत असलेल्या कार्याचे कौतुक आणि स्त्री शक्तीचा  सन्मान करण्यासाठी “महिला मुक्ती दिन दिन” कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रस्ताविक मध्ये तोटावार यांनी महिला दिनाचे महत्व विषद केले तर प्रमुख अतिथी डॉ. डोके यांनी महिला दिन का साजरा करतात तसेच महिला सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे  तर प्रमुख अतिथी सौ. वेणूताई मशाखेत्री अध्यक्षा शाळा व्यस्थापन समिती, योगिता प्रमोद सहारे, सौ. ज्योती खुशाल मडावी, कु.रेखा कोरेवार, यामिनी नागपुरे, श्रीमती उमारानी चेलमेलवार, श्रीमती गीता जुनघरे होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी “सशक्त नारी सशक्त भारत “या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षा, सर्व महिला शिक्षिका, महिला पालक, तसेच पोषण आहार महिला कर्मचारी द्वारकाबाई वालदे, कविता मडावी, लक्ष्मी बोरुले, यांचा सांस्कृतिक विभाग प्रमुख बोकडे तसेच मुख्याध्यापक प्रशांत साळवे यांचे हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कांचन दशमुखे तर आभार कुमारी रजनी मडावी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोहन देवकात्ते, हरीश पठाण, गेडाम, ओम देशमुख,भालेराव, बादल वरघंटीवार, जयराम कोरेटी, भालचंद्र कोटगले यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here