The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील ६७ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ (पोकरा) अंतर्गत ग्राम कृषि विकास समिती सदस्य व स्वयंसेवक यांच्यासाठी २ एप्रिल २०२५ रोजी वेबिनारद्वारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारमध्ये प्रकल्पाचा परिचय, सूक्ष्म नियोजन व आराखडा तयार करणे, बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती पद्धती, भूमातेचे आरोग्य संवर्धन व पाण्याचा ताळेबंद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पद्मश्री पोपटराव पवार, मृदा विज्ञान तज्ञ विजय बोरकर आणि डॉ. अविनाश पोळ (पाणी फाउंडेशन) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये तालुक्यातील ६७ गावांतील ग्राम कृषि विकास समिती सदस्य, स्वयंसेवक, कृषिताई, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी कार्यालय, धानोरा यांच्या वतीने करण्यात आले.
