धानोरा तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने धान पिकाची नुकसान

189

– संबंधित विभागाने व विमा कंपनीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २१ : तालुक्यात १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटात आणि वादळासह सरासरी एक तास पडलेल्या पावसामुळे व १९ ऑक्टोबर ला पुन्हा आलेल्या पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
धानोरा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता संपुर्ण तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने पळविला. या आलेल्या वादळात अनेक शेतकऱ्यांचे कापण्यायोग्य धान पिक अक्षरा झोपले, जमिनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर शेतात कापनी केलेले धान पिक बांध्यात पाणी साचल्याने कपडा तरंगायला लागल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसतात.
अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व विजेच्या कडकडासह १८ ऑक्टोंबर ला सायंकाळी पाच वाजता पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात उभे असलेले धान पिक आधिच करपा, बेरड, मानमोडी, घाटे अळीने पिक फस्त केले. त्यामुळे आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा अवकाळी लांबा झाला. धान तोडलेल्या कळपा व धान पिकाची अतोनात नुकसान झाली, वाऱ्याबरोबर पाऊस पडत असल्याने जडधान आडवे पडले आहेत व कापलेल्या कडपा पाण्यावर डोलायला लागल्याने धान्य करपणार आहेत. धान पूर्णपणे पाण्यात भिजलेले आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी व विमा कंपनीने सुद्धा याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here