धानोरा पोलीसांनी चोवीस तासाच्या आत लावला दोन बेपत्ता बहिणींचा शोध

1786

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या दोन बहिणींचा धानोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत शोध लावत कुटुंबाच्या स्वाधीन केले.
काकडयेली येथील सिताराम कारु बोगा (वय ६२) वर्षे रा. काकडयेली ता. धानोरा जि. गडचिरोली यांनी २४ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशन, धानोरा येथे येऊन त्यांंची मोठी मुलगी सौ. छाया प्रमोद हलामी (वय ३३) रा. वानरचुवा ता. आरमोरी जि. गडचिरोली ही वानरचुवा येथुन माहेरी त्यांना भेटण्यासाठी ७ सप्टेंबर २०२४ रोजी काकडयेली येथे आली होती व ती तेव्हापासुन त्यांचेकडेच काकडयेली येथे वास्तव्यास होती. परंतु २० सप्टेंबर २०२४ रोजी अंदाजे दुपारी ०३:३० वाजता दरम्यान त्यांची लहान मुलगी कु. शिला सिताराम बोगा (वय २०) रा. काकडयेली ता. धानोरा जि. गडचिरोली हिचे सोबत कोणालाही न सांगता काळी पिवळी चारचाकी वाहनाने धानोराकडे जातांना दिसल्या, परंतु रात्रो पर्यंत त्या दोघी बहिणी घरी परत आल्या नाहीत. याबाबत नातेवाईकांकडे, त्यांच्या मैत्रिणींकडे व इतर ठिकाणी विचारपुस केली असता, त्या दोघींचा शोध लागला नाही. त्यामुळे २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सिताराम कारु बोगा यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे धानोरा येथे मिसींग रिपोर्ट दाखल करण्यात आली.
त्यानंतर सौ. छाया प्रमोद हलामी व कु. शिला सिताराम बोगा ह्रा दोन्ही बहिणींचा शोध घेत असतांना पोस्टे धानोराचे प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील धुळे यांना त्यांचे गोपनिय सुत्रांकडुन नमुद दोन्ही मुली ह्रा औंधी (छत्तीसगड) येथे असुन सौ. छाया प्रमोद हलामी ही रागाच्या भरात घरातुन निघुन जाऊन जीवाचे बरे वाईट करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली औंधी (छत्तीसगड) येथील पोलीसांशी संपर्क साधुन ताबडतोब औंधी (छत्तीसगड) येथे जाऊन सतर्कतेने २४ तासाचे आत दोन्ही बेपत्ता मुलींचा शोध घेऊन पोस्टेला आणुन सुखरुप त्यांच्या वडीलांच्या ताब्यात देण्यात आल्या.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प कारवाफा अतिरीक्त कार्यभार उपविभाग धानोरा जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे धानोरा पोनि. स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात मपोउपनि. चैत्राली भिसे, पोहवा/भजनराव गावडे, मपोअं/प्रियंका कावळे, वैष्णवी पालकुर्तीवार यांनी पार पाडली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here