– भर पावसाळ्यात शेतातील कामाचा बळी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा , दि. २२ : शेतातील पावसाळी रोवणीच्या कामात गर्क असलेल्या एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धानोरा तालुक्यातील तुकुम येथील मनीराम हलामी (वय ७०) हे २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडले.
मनीराम हलामी हे नेहमीप्रमाणे शेतात रोवणीचे काम करीत असताना सायंकाळी ४ वाजता सापाने चावा घेतला. शेत गावापासून दूर असल्यामुळे त्यांना घरी आणण्यास विलंब झाला. त्यामुळे विष शरीरात झपाट्याने पसरले.
सुरुवातीस त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तत्काळ गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृतक मनीराम हलामी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
शेतकरी कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoranews
#SnakeBiteDeath #FarmerDiesInField #GadchiroliNews #DhanoraTaluka #AgriculturalHazards #MonsoonFarming #RuralHealthcare #CompensationDemand #SnakebiteVictim #MaharashtraRuralNews #सर्पदंश #शेतकरीमृत्यू #धानोरा #गडचिरोली #खरिपहंगाम #शेतीमधीलअपघात #आरोग्यसेवा #शासकीयभरपाई #शेतकरीआर्थिकमदत #ग्रामीणघटना
