– पौराबाई दुसऱ्यांदा झाल्या विधवा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील तुकूम येथील शेतकरी काशीराम बाजीराव मडावी (५२) यांचा शेतावर जाताना नाल्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
३ जुलै रोजी ते पत्नी व मुलीसह धानोऱ्यात बाजारासाठी गेले होते. रात्री शेतावर जातो म्हणून निघाल्यानंतर परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळून आले.
काशीराम यांच्या मृत्यूनं पत्नी पौराबाई पुन्हा विधवा झाल्या आहेत. पहिल्या पतीनंतर दुसऱ्या विवाहातून उभा राहिलेला संसार पुन्हा उद्ध्वस्त झाला. त्यांच्या मुलीचं शिक्षण सुरू असून कुटुंब आर्थिक अडचणीत आहे.
ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FarmerDeath #TragicIncident #FloodFatality #WidowAgain #RuralIndia #GadchiroliNews #NatureStrikes #VillageLife #NeedGovernmentHelp #HeartbreakingStory
#शेतकरीमृत्यू #निसर्गआपत्ती #विधवा #गावकथा #धानोरा #शासनमदत #ग्रामीणहकीकत #शोकांतिका #शेतकऱ्यांचीदु:खे #गडचिरोली