दारूमुक्त होण्याचा ५९ रुग्णांचा निर्धार

185

The गडविश्व
गडचिरोली, २५ जानेवारी : दारू सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना गावातच उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तीपथ तर्फे गावपातळीवर व्यसन उपचार शिबिर घेतले जात आहे. नुकतेच गर्कापेठा, देवलमारी, गोमणी, इंदिरानगर व कोयर या गावात आयोजित शिबीरातून ५९ जणांनी उपचार घेतला.
सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील शिबिरात १० जणांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका चमूने केले. अहेरी तालुक्यातील देवलमारी येते गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण १३ पेशंटने पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मारी तर पेशंटची नोंदणी स्पार्क कार्यकर्ता स्वप्निल बावणे यांनी केले. शिबिराचे यशस्वीतेसाठी गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, आशाताई यांनी सहकार्य केले. दोन्ही शिबिरांमध्ये पेशंटची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी घेतली व समुपदेशन समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी केले. मूलचेरा तालुक्यातील गोमणी येथील शिबिरातून १९ जणांनी उपचार घेतला. यशस्वीतेसाठी उपसरपंच साईनाथ चौधरी , माजी सरपंच शंकर वंगावार , पोलिस पाटील पुरुषोत्तम चौधरी, ग्रा. पं.सदस्य लक्ष्मीकांता गर्तुलवार, ग्रा. पं.सदस्य शकुंतला मरापे ,अंगणवाडी सेविका शिलाबाई गोंगले यांनी सहकार्य केले. दरम्यान, प्राजक्ता मेश्राम यांनी समुपदेशन करीत दारुचे व्यसन सोडण्यासाठी नियमित उपचार घेण्याचे आवाहन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, दारुचे दुष्परिणाम पटवून दिले. नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ती नम्रता मेश्राम यांनी केले .
सिरोंचा तालुक्यातील इंदिरानगर येथे गाव पातळी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६ पेशंटने पूर्ण उपचार घेतला. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोयर येथील शिबिरात ११ रूग्णांची नोंदणी व पूर्ण उपचार घेतला. समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांची तपासणी व धोक्याचे घटक सांगितले आणि संयोजक पूजा येल्लुरकर यांनी केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम समजावून सांगीतले. शिबिर यशस्वीतेसाठी गावसंघटन प्रमुख व उपसरपंच प्रकाश पुंगाटी यांनी सहकार्य केले. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ कार्यकर्ते आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath)
(UPSSSC PET Result) (Southampton vs Newcastle) (Adani) (Bundesliga) (STA vs THU)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here