देसाईगंज : जप्त केलेली सोळा लाखांची दारू पोलीसांनी केली नष्ट

207

The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्हयातील एकुण १६ लाख रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल २७ डिसेंबर रोजी नष्ट करण्यात आला.
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल २७ डिसेंबर रोजी पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमालाच्या बॉटलांवर रोड रोलर चालवून चुरा करून नष्ट करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.

हा मुद्देमाल करण्यात आला नष्ट

१)देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या
२) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या
३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या
४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या
५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन
असे एकुण ३७,९९४ बॉटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here