देसाईगंज : घरकुल लाभार्थ्यांना दिलासा, पाच ब्रास मोफत रेतीचा मार्ग मोकळा

59

– मा. आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. १५ : रेतीअभावी ठप्प झालेल्या घरकुल बांधकामांना आता नवा श्वास मिळणार आहे. मा. आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश मिळत, देसाईगंज तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुले रेतीच्या अभावामुळे रखडली होती. ऑनलाईन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या नेटवर्क सुविधेचा अभाव आणि वाढलेले दर यामुळे लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. यावर तोडगा म्हणून माजी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत रेती उपलब्धतेचा मार्ग मोकळा केला.
९ मे रोजी तहसीलदार डूडूलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १२ मेपासून मोफत रेती वितरणाचे आदेश देण्यात आले. या बैठकीस गटविकास अधिकारी, विविध गावांचे सरपंच आणि नागरिक उपस्थित होते.
या निर्णयामुळे घरकुल बांधकामाला गती मिळणार असून, अनेक कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here