देसाईगंज नगरपरिषदेचे जप्ती पथक ॲक्शन मोडवर

324

The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. ०८ : नगर परिषद देसाईगंज मधील थकीत करदात्यांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम नगरपरिषदेने सुरु केलेली आहे. याअंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करदाते यांचे घरी जावून त्यांचे घरातील साहित्य जप्त करण्यात येत आहे. यामध्ये कोणाचे कूलर, टीव्ही, सोफा, टेबल, खुर्च्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात येत आहे. तसेच ते साहित्य जप्त करून त्यांचा लिलाव करून वसुलीची रक्कम जमा करण्यात येत आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात आंबेडकर, भगतसिंग, नैनपूर वार्डमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये नागरिकांच्या घरी जप्तीचे पथक येत असल्यामुळे थकीत करदाते लगेच कराची भरणा करीत आहे तसेच इतर करदाते स्वत:हून पुढाकार घेवून कर भरणा करीत आहे. कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्नमवार , किदवाई, जवाहर, वडसा, शास्त्री व चव्हाण वार्डामध्ये जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये माता, शिवाजी, तुकूम, कस्तुरबा, गांधी, हनुमान, विर्शी या वार्डामध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी कराची भरणा वेळेत करावी व होणाऱ्या कारवाईला टाळावे तसेच यानंतरही कर थकीत ठेवल्यास १ एप्रिल पासून २ टक्के प्रती महिन्याप्रमाणे २४ टक्के पर्यंत शास्ती आकारण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांनी सांगितले आहे.शहरात विविध प्रभागात ५ वसुली पथक फिरत आहे तसेच कार्यालयात २ पथक वसुली करत आहे. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नगरपरिषदेने जप्तीची कारवाई हाती घेतलेली आहे. यामध्ये एक जप्तीचे पथक मुख्याधिकारी यांनी तयार केलेले आहे. हे पथक थकीत करदाते यांचे घरी जाऊन जप्ती मोहीम राबवीत आहे. पथकामध्ये स्वप्नील हमाने कर निरीक्षक, प्रफुल हटवार कर व प्रशासकीय अधिकारी, संगणक अभियंता प्रशांत चिचघरे, अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन, सहा.नगर रचनाकार दिव्या परतेकी, कर लिपिक दिनकर खेत्रे, मुकेश सोनेकर, शैलेश खांडेकर, विमल सोनावणे व इतर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here