– ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर पदावर मानधन तत्वावर भरती केली जाणार आहे. ही भरती फक्त अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांसाठी असून, नियुक्ती दहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे.
उमेदवाराकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच MSCIT प्रमाणपत्र, MS Excel व PowerPoint मध्ये कामाचा अनुभव,
मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट या गतीचे प्रमाणपत्र, स्थानिक गोंडी भाषेचे ज्ञान आणि शासकीय कार्यालयातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ११ जुलै २०२५ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#गडचिरोलीभरती #आदिवासीप्रकल्प #डाटाएंट्रीऑपरेटर #सरकारीनोकरी #ScheduledTribeJobs #EmploymentOpportunity #MSCIJob #TribalDevelopment #गडचिरोलीनोकरी #मंजूरभरती
#गडचिरोलीभरती #आदिवासीविकास #सरकारीनोकरी #DataEntryOperator #EmploymentNews