The गडविश्व
गडचिरोली, २८ जानेवारी : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात स्पाईन फाऊंडेशन मुंबई व सर्चच्या संयुक्त विद्यमाने दैनंदिन (सोमवार ते शनिवार) मणक्याची तपासणी ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या रुग्णांना कंबरेचे दुखणे असून ते दुखणे पायात जाते, चालल्यावर ज्यांना ज्या पायात कमजोरी येते किंवा पायातील दुखणे वाढून थांबावे लागते, मणक्यात ग्याप आहे किंवा मणक्यातली नस चिपकली आहे, ज्यांना मणक्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे, ज्यांच्या पाठीला वाक आहे, पाठ वाकडी आहे, ज्यांना मानेचे दुखणे आहे आणि हे दुखणे हातात जाते अश्या सर्व रुग्णांनी त्यांची तपासणी सर्च दवाखान्यातील रुग्णालयीन दैनंदिन ओपीडी (सोमवार ते शनिवार) मध्ये तपासणी करून घ्यावी. दैनंदिन ओपीडीत तपासणी करून ज्या रुग्णांना शस्रक्रियेची गरज आहे. अशा रुग्णांची शस्त्रक्रिया भारतातील नामवंत स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजरज व त्यांची टिम यांच्याद्वारे स्पाईन शिबिरात अल्प दरात करण्यात येते. तरी गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, अशी माहिती संचालिका डॉ. राणी बंग आणि वैद्यकीय अधिकारी दत्ता भलावी यांनी दिली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)