The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : प्रदूषणमुक्त भारताचा संदेश आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने “सायकल तिरंगा यात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा उद्या मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा चौक येथून भव्य स्वरूपात सुरू होणार आहे.
यात्रेचा मार्ग इंदिरा गांधी चौक → पटेल सायकल स्टोर्स → आठवडी बाजार → कारगिल चौक → विश्रामगृह, इंदिरा चौक असा असून, संपूर्ण प्रवास सुमारे एका तासात पूर्ण होईल.
या उपक्रमात वसंत विद्यालय, महिला महाविद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळा- महाविद्यालयांतील प्रत्येकी ५० विद्यार्थी, असे एकूण ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायकल प्रेमी नागरिकांनाही यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
हा संदेशवाहक उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अध्यक्ष प्रा. विलास पारधी, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, प्रा. सुनीता साळवे, सचिव उदय धकाते, सहसचिव योगिता दशमुखे, विजय साळवे, सुचिता धकाते, प्रा. अरुण पालारपवार, विलास निंबोरकर, सुचिता कामडी, मीरा बिसेन, विनायक साळवे, पुरुषोत्तम ठाकरे, प्रा. ज्ञानेश्वर धकाते, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, माधुरी बोरकर, किशोर पाचभाई, डॉ. शिल्पा कोहळे आदींचा सहभाग व सहकार्य आहे.
#thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #latestnews
