धानोरा तहसील कार्यालयात पीक विमा जनजागृती सप्ताह संपन्न

25

– शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी विमा उतरवण्याचे आवाहन
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. १० : धानोरा तहसील कार्यालयाच्या वतीने पीक विमा संरक्षण जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने पीक विमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार आम्रपाली लोखंडे यांनी केले.
सप्ताहाचा शुभारंभ भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी किशोर चौधरी, मंडळ अधिकारी संतोष चलाख, नायब तहसीलदार वाळके, विमा प्रतिनिधी निलेश वासेकर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, शेतकरी आयडी, 7/12 उतारा (पीक पेरा नमूद असलेला), 8अ यांचा समावेश असून, विमा उतरवण्यासाठी जवळील सेतू केंद्र, कृषी कार्यालय, महसूल अधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
जिल्ह्यात बहुतांश भागांमध्ये भाताची लागवड केली जाते. यासाठी प्रती हेक्टर विमा संरक्षण रक्कम 51,250 रुपये असून, शेतकऱ्यांना केवळ 512 रुपये हप्ता भरावा लागतो. विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे.
दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना पीक पेरा विमा ॲपद्वारे स्वतः नोंदवण्याची सक्ती केली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी नेटवर्कचा अभाव असल्याने आणि ॲप सुरू होण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करून ॲप व्यवस्थित कार्यान्वित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #CropInsurance #FarmerAwareness #Dhanora #AgricultureScheme #InsuranceDeadline #31JulyLastDate #FarmerSupport #GovtSchemes #RuralDevelopment #AgriInsuranceAppIssues #Gadchiroli
#पीकविमा #शेतकरीहित #गुरूभक्ति #धानोरा #विमा_जनजागृती #कृषीविमा #तहसील_कार्यालय #31जुलैअंतिममुदत #विमा_अँप_अडचणी #शेतकऱ्यांचा_हक्क #गडचिरोली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here