एमएमसी झोनला तडा ; १२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
– AK-47 आणि इंसास रायफलसह केले आत्मसमर्पण
The गडविश्व
बस्तर/ विशेष प्रतिनिधी, दि. ०८ : छत्तीसगडच्या उत्तर बस्तर डिव्हिजनमध्ये सक्रिय सीपीआय (माओवादी) नेता आणि सेंट्रल कमिटी मेंबर (CCM) रामधेर मज्जी याने सोमवारी (०८) खैरागड तालुक्यातील कुम्ही गावात (पोलिस ठाणे – बकरकट्टा) 11 साथीदारांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सर्व नक्षलींनी हत्यारे खाली ठेवत मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दर्शवली.
रामधेर मज्जीने आत्मसमर्पणाच्या वेळी AK-47 रायफल सुपूर्द केली. त्याच्यासोबत डिव्हिजनल कमिटी मेंबर (DVCM) स्तरावरील चंदू उसेंडी, ललिता, जानकी आणि प्रेम यांनीही शरणागती पत्करली. यापैकी दोघांकडे AK-47 आणि इंसास रायफल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याच कारवाईत एरिया कमिटी मेंबर (ACM) स्तरावरील रामसिंह दादा आणि सुकेश पोट्टम यांनीही समर्पण केले. तसेच पार्टी मेंबर (PM) लेवलचे लक्ष्मी, शीला, योगिता, कविता आणि सागर यांनीही शस्त्रे खाली ठेवली. त्यांच्याकडून AK-47, इंसास, SLR, .303 आणि 30 कार्बाइनसह अनेक शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला.
हे सर्व एमएमसी (महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड) स्पेशल झोनल कमिटी मध्ये सक्रिय होते. या कमिटीची तीन राज्यांतील सहा जिल्ह्यांत खोलवर पकड होती. सर्व 12 नक्षलींकडून पोलिस तपास सुरू आहे.
दरम्यान, याच्याच आदल्या दिवशी रविवारी मध्यप्रदेशातील बालाघाट येथे 10 नक्सलींनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यात 62 लाखांचे इनामी हार्डकोर माओवादी सुरेंद्र उर्फ कबीरचाही समावेश आहे.
या दहा नक्षलिंकडून पोलिसांनी दोन AK-47, दोन इंसास रायफल, एक SLR, दोन SSR, सात BGL सेल आणि चार वॉकी-टॉकी जप्त केले. सर्व 10 नक्सलिंवर मिळून एकूण 2 कोटी 36 लाखांचे इनाम घोषित होते.
सलग दोन दिवसांत झालेल्या या आत्मसमर्पणामुळे एमएमसी झोनवरील दबाव वाढला असून, सुरक्षा दलांसाठी ही मोठी आणि समाधानकारक कामगिरी मानली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #thegadvishva #naxalsurrender #MMCZone #MaoistsSurrender #RamdherMajji #HardcoreNaxal #Bastar #PoliceSuccess #AK47Seized #MaharashtraMadhyaPradeshChhattisgarh #SecurityForces #NaxalCrackdown














