– इंडिया आघाडीला मोठा धक्का
The गडविश्व
नवी दिल्ली, दि. ०९ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते.https://x.com/ANI/status/1965414148030038218?s=19
या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 15 मते अवैध ठरली. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना 300 मते मिळाल्याने एनडीएचा दणदणीत विजय निश्चित झाला.
लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण 788 खासदार असले तरी 7 जागा रिक्त आहेत. याशिवाय 13 खासदारांनी मतदान न करता दूर राहणे पसंत केले. त्यामुळे अपेक्षित 781 मतांऐवजी 768 मतांची मोजणी झाली. मतदान टाळणाऱ्यांमध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचा १ आणि एक अपक्ष खासदार यांचा समावेश आहे.
एनडीएचे 427 खासदार मतदानासाठी हजर राहिले होते. निकालानंतर संसदीय राजकारणात एनडीएची ताकद पुन्हा अधोरेखित झाली असून, इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
#thegdv #thegadvishva #CPRadhakrishnan #VicePresidentElection #NDAVictory #INDIAAlliance #IndianPolitics #Parliament #Delhi #BreakingNews
#सीपीराधाकृष्णन #उपराष्ट्रपतीनिवडणूक #एनडीएविजय #इंडियाआघाडी #राजकारण #संसद #दिल्ली #गडविश्व #ताजाबातमी














