– नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना घडली घटना
The गडविश्व
बीजापुर (छ.ग), दि. १८ : नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपला भ्याड चेहरा दाखवत सुरक्षादलांवर घात केला आहे. बीजापुर जिल्ह्यातील भोपालपट्नम परिसरातील उल्लूरच्या जंगल भागात १८ ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या आयईडी (IED) स्फोटात जिल्हा राखीव रक्षक दलाचा (DRG) एक जवान शहीद झाला तर ३ जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
DRG ची टीम नक्षलविरोधी भोपालपट्नम परिसरातील उल्लूरच्या जंगल भागात विशेष मोहिमेसाठी रवाना झाली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी गुप्तपणे लावलेला आयईडीचा स्फोट झाला. यामध्ये एक जवान शहीद तर ३ जवान गंभीर जखमी झाले. दिनेश नाग असे शहीद जवानाचे नाव आहे तर जखमी जवानांची नावे अद्याप कळू शकली नाही. दरम्यान घटनास्थळावरून चारही जवानांना तातडीने हलविण्यात आले असून जखमी जवानांवर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात नक्षल विरोधी अभिया तीव्र करण्यात आल्याचे कळते.https://x.com/ANI/status/1957278118730723545?s=19
गेल्या काही दिवसांपासून बीजापुर, दांतेवाडा, गडचिरोली या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळत आहे. त्यामुळे हतबल नक्षलवादी पुन्हा एकदा भ्याड हल्ल्यांचा आधार घेत असल्याचे समजते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #newsupdte #बीजापुर #छत्तीसगड #नक्षलवाद #IEDहल्ला #DRGजवान #शहिद #नक्षलविरोधीमोहीम #भ्याडहल्ला #जवानांचाबलिदान #NaxalAttack #Bastar #SecurityForces
#Bijapur #Chhattisgarh #NaxalAttack #IEDBlast #DRG #Martyr #InjuredSoldiers #AntiNaxalOperation #SecurityForces #Braveheart #Bastar
