– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पाहणी व निर्देश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २४ : धानोरा येथे उभारण्यात येत असलेल्या आधुनिक क्रीडा संकुलाच्या बांधकामाची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज, २४ मार्च २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या व दर्जेदार बांधकामासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार नरोटे यांनी संकुलाच्या उभारणीस गती देण्याचे निर्देश देत, युवकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी उच्च दर्जाचे काम करण्याचे आवाहन केले. “या क्रीडा संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळून त्यांच्या प्रगतीला चालना मिळेल,” असे ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

#धानोरा #क्रीडासंकुल #बांधकामप्रगती #आमदारमिलिंदनरोटे #युवकांसाठीसुविधा #क्रीडाक्षेत्र #विकास #भाजपा #स्थानिकवृत्त
#Dhanora #SportsComplex #ConstructionProgress #MLAMilindNarote #YouthFacilities #SportsDevelopment #BJP #LocalNews #Infrastructure